जळगाव शहरातील रस्ते विकासासाठी शंभर कोटी : मुख्यमंत्र्यांची घोषणा


जळगाव (13 ऑगस्ट 2024) : जळगाव दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावकरासाठी मोठी घोषणा केली आहे. जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये देण्यात येतील, असे भाषणात मुख्यमंत्री म्हणाले आहेत. जळगावच्या सागर पार्कवर मंगळवारी महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते.

आमदार भोळे यांच्या मागणीला यश
गेल्या काही महिन्यात जळगाव शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची कामे झाली व काही सुरू आहेत तर काही ठिकाणच्या रस्त्यांसाठी अजून निधीची गरज असल्याने जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती.

मंगळवारी जळगावच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी देखील जळगावच्या रस्त्यांच्या विकासासाठी 100 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी आमच्या जळगाव मधल्या नेत्यांनी केली असल्याचं म्हटले. यानंतर मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमात भाषणात जळगाव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी 100 कोटीच्या निधीची घोषणा केली. यामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरातील नवीन तसेच खराब रस्ते दुरुस्तीला वेग मिळणार आहे.


कॉपी करू नका.