शनी पेठ पोलिसांना वॉण्टेड असलेला आरोपी जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : पाच वर्षांपासून आरोपीचा सुरू होता शोध

जळगाव : शनी पेठ पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल पाच वर्षांपासून आरोपी पोलिसांना चकवा देत होता मात्र अखेर त्याला अटक करण्यात यश आले. सद्दाम खान नजिर खान (21, रा.गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या नेतृत्वात विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अश्रफ शेख व राहुल पाटील आदींनी आरोपीला अटक केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !