जळगावात कुंटणखान्यावर धाड : चौघांना अटक


जळगाव : सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कुंटणखाना चालवणार्‍या महिलेसह दोन पुरूष व 27 वर्षीय पिडीतेला ताब्यात घेण्यात आले. लक्ष्मी पार्क परीसरात एक 45 वर्षीय महिला घरातच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 45 वर्षीय महिला ही या कुंटणखान्याची मालकीण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिच्याकडून 10 हजार 680 रुपयांसह अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरूद्ध एमआयडीसी पोलिसात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !