भुसावळातील लाचखोर अव्वल पुरवठा कारकुनाला तीन दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ : रेशन दुकानदाराकडून लाच मागणार्या भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकून रवींद्र विनायक तारकस (57, हकीमी कॉम्लेक्स, जाम मोहल्ला, शालिमार हॉटेलजवळ, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातून एक हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. आरोपी तारकस यांना मंगळवारी दुपारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एसीबीतर्फे पोलिस निरीक्षक निलेश लोधी उपस्थित होते.
