बोदवडला 45 वर्षीय इसमाची आत्महत्या
बोदवड : शहरातील 45 वर्षीय इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 10 रोजी रात्री आठ ते दहा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. एकनाथ उर्फ राजेंद्र विठ्ठल बरकले (45) असे मयत इसमाचे नाव आहे. प्रभाग 17 मधील राहत्या घरात बरकले यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. पत्नीसह तीन मुले बाहेर जेवायला गेल्यानंतर बरकले यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परीवार आहे. या प्रकरणी धीरज प्रकाश टापरे यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक गजानन काळे करीत आहेत.


