भुसावळात दुध विक्रेत्याचा खून : आरोपीची कारागृहात रवानगी
भुसावळ : भुसावळातील जुना सातारा भागातील कोळीवाड्यात साकेगावच्या दुध विक्रेत्याच्या झालेल्या खुनातील संशयीताची पोलिस कोठडी संपल्याने त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अनैतिक संबंधाच्या संशयातून साकेगाव येथील दुध व्यावसायीक नसीर बशीर पटेल (40) यांचा सोमवार, 2 रोजी आरोपी धीरज गणेश शिंदे (22, रा.जुना सातारा, भुसावळ) याने डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. डीवायएसपी गजानन राठोड पुढील तपास करीत आहेत.


