राज्यात पावसाचा धुमाकूळ : आगामी पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई (1 सप्टेंबर 2024) : राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू असून पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. राज्यात आगामी चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पावसाची तीव्रता 4 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के.एस. होसाळीकर यांनी. गोदावरी नदीच्या काठावरील शंभर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लातूरसह नांदेड जिल्ह्याला रेड अलर्ट, पिकांचे नुकसान
लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे. लातूरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे.


नांदेड जिल्ह्याला देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे. गोदावरी नदी व इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आले आहे. मूग, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परळी शहरासह 15 गावांना पानी पुरवठा करणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे. धरणातील पानी वाण नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणीही ओसंडून वाहत आहे. याच सोबत परभणी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे.
