बोदवडच्या राजा गणेश मंडळातर्फे अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप


बोदवड (12 सप्टेंबर 2024) : चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती विघ्नहर्त्या गणरायाची शहरातील बाळासाहेब ठाकरे नगरात बोदवडचा राजा गणेश मंडळातर्फे विधीवत स्थापना करण्यात आली. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील प्रतिष्ठांना आरतीचा मान दिला जातो व गणरायाला पुष्पहार न आणता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन केले जाते. या आवाहनाला दात्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या मंडळाचे नेतृत्व या सर्व महिलाच करीत आहेत. दहा दिवस उत्सव पार पडल्यानंतर दात्यांच्या सहकार्यातून आलेले शैक्षणिक साहित्य जलचक्र जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते. बदलत्या काळात उत्सवाचे स्वरूप बदलून त्यात लाखो रुपयांचा एकीकडे होणारा खर्च व दुसरीकडे खर्चाला कात्री देत गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम निश्चित समाजमनाला प्रेरणादायी आहे. या मंडळात प्रमिला संजय वराडे यांच्या नेतृत्वात महिलांची टीम कार्यरत असते. नुकतीच बोदवडच्या राजयाची आरती करण्याचा मान डॉ.संजय तायडे, सिध्दार्थ गवई, अरुण बावस्कर, नाना पाटील यांना देण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !