जळगाव तालुका पोलिसांची गांजावर कारवाई : भोकरच्या संशयीताविरोधात गुन्हा
जळगाव : जळगाव तालुका पोलिसांनी भोकर परिसरात कपाशीच्या शेतात लावलेल्या गांजावर कारवाई करत एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकाश दशरथ सोनवणे (58, रा.भोकर, ता.जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी चार वाजता तालुका भोकर-पळसोद शिवारात करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुक्यातील भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, एपीआय अनंत अहिरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, नयन पाटील, हवालदार दीपक चौधरी, बापू पाटील, किरण अगोणे, चेतन पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या पथकाला शेतात कपाशीच्या पिकात गांजाचे 27 झाडें लावलेली आढळून आली. पोलिसांनी ही झाडं जप्त केली असून 12 किलो वजन व अंदाजे 40 हजार रुपये त्याची किंमत आहे. या प्रकरणी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

