भुसावळातील जीवघेण्या खड्ड्यात बसून राष्ट्रवादी-काँग्रेसचे अनोखे आंदोलन


A unique movement of NCP-Congress sitting in the deadly pit in Bhusawal भुसावळ (13 सप्टेंबर 2024) : विघ्नहर्त्या गणरायाचे देखील शहरातील खड्डेमय रस्त्यावरून झाले मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर पालिका प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याने गुरुवारी दुपारी जामनेर रोडवर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी खड्ड्यात बसून आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाचा निषेध करीत घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस या आंदोलनात सहभागी झाली मात्र शिवसेना उबाठा गट अलिप्त राहिला.

पालिकेने दिले ठोस आश्वासन
शहरातील जामनेररोड, मिरवणूक मार्ग, ब्राह्मण संघ मार्ग आदी रस्त्यांवर खड्डे ‘जैसे थे’ असून पावसाने उघडीप दिल्यानंतरही पालिकेला रस्त्यांची डागडूजी वा पॅचवर्क करण्यास वेळ मिळाला नसल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनस्थळी येवून नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांनी दोन दिवसांत शहरातील खड्ड्यांची डागडूजी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, विरोधी पक्ष नेता उल्हास पगारे, काँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र निकम, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू डोंगरदिवे, शहर काँग्रेस सरचिटणीस संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष अजगर शेख, नितीन चौधरी, सागर पाटील, हर्षल पाटील, जगदीश वाघ, गोकुळ राजपूत, गजू पाटील, रॉनी तेलगोटे, राजेश चितोडीया, गोलू राजपूत, अमोल बर्‍हाटे, अश्विन लोखंडे आदींचा सहभाग होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !