मुक्ताईनगर तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत जे.ई.स्कूलचा संघ विजयी
मुक्ताईनगर (13 सप्टेंबर 2024) : मुक्ताईनगर तालुकास्तरीय 17 व 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या कबड्डी स्पर्धा एम.एम.नारखेडे विद्यालय, रुईखेडे येथील प्रांगणात झाल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील एकूण 17 संघानी सहभाग नोंदविला. स्कूल कमिटी चेअरमन चंद्रशेखर बढे, मुख्याध्यापक जे.जे.पाटील, तालुका क्रीडा समन्वयक संजीव वाढे, तालुका क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी ज्ञानदेव येवले, किरण भंगाळे उपस्थित होते. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक एस.एस.कांंडेलकर तर आभार योगीता झांबरे यांनी मानले. या क्रीडा स्पर्धेत 17 व 19 वर्ष वयोगटातील जे.ई.स्कूल व ज्यु.कॉलेजचा मुलांचा संघ विजयी झाला. 17 वर्षे गटात एम.एम.नारखेडे विद्यालय, रुईखेडा येथील मुलींचा संघ विजयी झाला.
कुर्हा संघ 19 वयोगटात विजयी
19 वर्षे वयोगटात स्व.अशोक फडके विद्यालय, कुर्ह्याचा संघ विजयी झाला. संघांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. विजयी संघाचे संस्थेच्या चेअरमन अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव सी.एस.चौधरी, पुरुषोत्तम महाजन, प्राचार्य एन.पी.भोंबे, आर.पी.बर्हाटे, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत पंच म्हणून गोपाल चौधरी, अनिल चव्हाण, एस.एस.कांडेलकर, मयुर महाजन, संजीव वाढे, मनोज चौधरी, गणेश बोदडे, भगीरथ बिरलिंगे, एस.जे.मोरे यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून ज्ञानदेव येवले, किरण भंगाळे, प्रकाश सावकारे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी व्ही.डी. तायडे, तुषार महाजन, योगीता झांबरे, बबीता तडवी यांनी परिश्रम घेतले.

