नाशिक हादरले : मुलीला विष देत दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या


Nashik shaken : Couple commits suicide after poisoning daughter नाशिक (19 सप्टेंबर 2024) : नाशिकचे इंदिरा नगर दाम्पत्यासह मुलीच्या मृत्यूने हादरले आहे. कंपनीत कामावर रूजू न झाल्याच्या नैराश्यातून दाम्पत्याने मुलीला विष पाजले व नंतर आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. विजय माणिक सहाणे (41), ज्ञानेश्वरी सहाणे (33), अन्यया सहाणे (10) अशी तिघा मृतांची नावे आहेत. बुधवार, 18 रोजी ही घटना सकाळी सात वाजता उघडकीस आली.

सकाळीच उघडकीस आली घटना
प्रतिगंगा रोहाऊसजवळ बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अनन्या सहाणे या मुलीला शाळेत नेण्यासाठी स्कूल बस आली. चालकाने आवाज देऊनही घरातून कुणीही येत नसल्याचे बघून चालक निघून गेले. मुलीचे आजोबा तळमजल्यावर राहत होते. त्यांनी वरच्या मजल्यावर राहणार्‍या मुलगा व सुनेच्या दरवाजाला वाजवून आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने मोठ्याने आवाज दिला. शेजारचे जमा झाले. दरवाजा तोडण्यात आल्यावर विजय व ज्ञानेश्वरी यांनी एकाच फॅनला गळफास घेतल्याचे तर अनन्या बेडवरून खाली निपचित पडल्याचे पाहून उपस्थितांनी एकच आक्रोश सुरू केला. मुलीच्या तोंडाला फेस तसेच गळ्यावर खुणा दिसून आल्या.

कंपनीविरुद्धची केस तीन वर्षांनंतर जिंकली, रुजू होऊनही काम नाही
विजय सातपूरमधील कंपनीत कंत्राटी कामगार होते. 20 ऑक्टोबर 2021 ला त्यांच्यासह 600 जणांना कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. 22 जुलै 2024 ला या सर्व कामगारांना कामावर घेण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानुसार सहाणेंसह सर्व कामगार कामावर दाखल झाले. त्यानंतर 400 कामगारांची दुसर्‍या ठिकाणी बदली करण्यात आली.

इंदिरा नगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
मात्र, यात सहाणेंचा समावेश नव्हता. कंपनीत काम दिले जात नसल्याने तसेच याच काळात आर्थिक चणचणीमुळे त्यांना वैफल्य आले. त्यातूनच हे टोकाचे पाऊल त्यांनी उचलले असल्याचा नातलगांनी दावा केला आहे. पण पोलिस दप्तरी कुटुंबीयांनी तक्रार दिली नाही. आर्थिक विवंचनेतून व मानसिक तणावामुळे आत्महत्येचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत ते कंपनीत जात असल्याचेही कुटुंबीय म्हणाले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

..असा झाला उलगडा

बुधवारी सकाळी विजय सहाणे यांचे आई-वडिल उठले. माणिक सहाणे यांनी मुलाला व सूनेला हाका मारल्या मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून ते खालून वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीचे दार वाजविण्यासाठी गेले. जोरजोराने दार वाजवूनसुद्धा कुठलाही प्रतिसाद आतमधून येत नसल्याचे बघून त्यांनी शेजारींची मदत घेतली. शेजारचे काही लोक त्यांच्या घरी आले. त्यांनीही दरवाजा जोरजोराने वाजविला. नंतर दरवाजाला धक्के देऊन तो तोडला. त्यावेळी छताला सुती दोरीच्या साह्याने पती-पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले अन खोलीतील पलंगावर मुलगीही निपचित पडलेली होती. तातडीने नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविली.

 


कॉपी करू नका.