जळगावातील महिलेची भुसावळातील तापी पात्रात आत्महत्या


भुसावळ (01 ऑक्टोबर 2024) : जळगाव शहरातील शनी पेठ भागातील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय महिलेने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली. बबली अरुण ढंढोरे (50, शनी पेठ, जळगाव) असे मयताचे नाव आहे. महिलेने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. शहर पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तापी पात्रात घेतली उडी
सूत्रांच्या माहितीनुसार, जळगावातील रहिवासी असलेली बबली ढंढोरे ही महिला सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता तापी पुलावर पोहोचल्यानंतर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क करीत आत्महत्या करीत असल्याची कल्पना दिली व काही क्षणात त्यांनी तापी पात्रात उडी घेतली. ही घटना कळताच नागरिकांनी गर्दी केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक राहुल भंडारी, पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सैय्यद आदींनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत ट्रामा सेंटरला शवविच्छेदनासाठी हलवला. मयताचे जावई आकाश राजेश टाक (वाल्मीक नगर, 72 खोली) यांनी शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.