राष्ट्रवादी कुणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर !

विधानसभेपूर्वी निर्णय घेण्याची शरद पवार गटाची मागणी


Whose nationalist? Supreme Court hearing postponed! नवी दिल्ली (01 ऑक्टोबर 2024) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा ? याबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार होती मात्र ती होवू शकली नाही. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वकिलांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकरण निकाली काढण्याचे आवाहन केले होते. यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 1 ऑक्टोबरला निश्चित केली होती. दरम्यान, पुढील सुनावणी कधी होणार ? याबाबत माहिती समोर आलेली नाही.

निवडणूक चिन्हासाठी निर्देश द्यावेत
गत सुनावणीत शरद पवारांच्या वकिलांनी दावा केला होता की, अजित पवार यांनी शरद पवारांना आपला देव म्हटले आहे आणि ते सर्व एकत्र आहेत. अजित पवार गटाने न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे न्यायालयाने अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीसाठी नवीन निवडणूक चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश द्यावेत, असे वकील म्हणाले.

खरेतर, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या 6 फेब्रुवारीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ज्यामध्ये अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ म्हणून मान्यता देण्यात आली होती.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ वापरण्यापासून रोखता यावे, यासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.


कॉपी करू नका.