भुसावळात संत तुकोबांचे वंशज शिरीष महाराजांचे उद्या तीन ठिकाणी प्रवचन
भुसावळ (03 ऑक्टोबर 20240) : संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप शिरीष महाराजांचे शुक्रवार, 4 रोजी शहरातील तीन ठिकाणी जाहीर प्रवचन होत आहे. शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळात ‘हिंदू संस्कृती’ या विषयावर प्रवचन होईल.
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक, महेश फालक, संजयकुमार नाहटा, श्याम दरगड आदींची उपस्थिती असेल. शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील मोठ्या विठ्ठल मंदिरात संध्याकाळी सात ते आठ या वेळात ‘पंढरीची वारी तुमच्या आमच्या मनात वसलेल्या विठ्ठलाची’ या विषयावर तसेच रात्री आठ ते नऊ या वेळात मातृभूमी चौकात ‘हिंदुत्वाचा जनसंवाद’ या विषयावर प्रवचन होईल. शहरवासीयांनी तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देऊन तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशाच्या वाणीतून होणार्या या प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.