भुसावळात भाजपा आमदार राहुल आहेर यांचे स्वागत


भुसावळ (03 ऑक्टोबर 20240) : भारतीय जनता पक्षाचे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व भुसावळ विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक राहुल आहेर हे दौर्‍यानिमित्ताने आल्यानंतर भुसावळ शहर भाजपा आघाडी तसेच मोर्चाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव राजेंद्र आवटे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल वसंत तायडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष भावेश चौधरी, उद्योग आघाडी अध्यक्ष आशिष पटेल, जैन प्रकोष्ट अध्यक्ष चेतनकुमार जैन, युवा मोर्चा सरचिटणीस लाजरस मणी, यशांक पाटील, विशाल देवकर उपस्थित होते.


कॉपी करू नका.