मंत्रालयात कामांची लगबग : 13 ऑक्टोंबरनंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ?


Bustle of work in the ministry : Code of conduct for assembly elections after October 13? मुंबई (03 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून असताना मंत्रालयात मात्र कामांची लगबग सुरू झाली आहे. 13 ऑक्टोबरनंतर निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे घटनात्मक तरतुदींनुसार निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सामान्यतः 45 दिवसांच्या आत नवी विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असत त्यामुळे 13 ऑक्टोबरनंतर केव्हाही राज्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयात हालचाली वाढल्या
ऑक्टोबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता ग्रहित धरून मंत्रालयातील हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवे प्रस्ताव व फायलींच्या मंजुरीचा वेग कैक पटीने वाढला आहे. विशेषतः मंत्रभ मंडळ बैठकीत तर निर्णयांचा धडाका सुरू आहे. दिवसाकाठी अनेक निर्णय हातावेगळे केले जात आहेत. यासाठी आमदारांपासून मंत्र्यांची धावाधाव सुरू आहे.





दुसर्‍या आठवड्यात वाजणार बिगुल
सूत्रांच्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर 2024 रोजी हरियाणा व जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे लागणार आहेत. त्यानंतर 10 तारखेला या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम संपुष्टात येईल. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसर्‍या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही त्यामुळे 14 तारखेपासून सुरू होणार्‍या आठवड्यात म्हणजे ऑक्टोबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात केव्हाही महाराष्ट्र निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो.

महायुती, मविआचे जागा वाटप रखडले
महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नाही. या दोन्ही आघाड्यांत सध्या जागा वाटपाची गरमागरम चर्चा सुरू आहे. अनेक जागांवरून त्यांच्यात मतभेदही निर्माण झाल्याची माहिती आहे. दोन्ही आघाड्यांत प्रत्येकी तीन घटकपक्षांचा समावेश असल्यामुळे जागावाटप करताना त्यांची आघाड्यांची दमछाक दिसून येते.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !