मुक्ताईनगरातील ऑक्सीजन प्लँट सुरू करा : अ‍ॅड.रोहिणी खडसे


मुक्ताईनगर (12 ऑक्टोंबर 2024) : कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने शासनाने प्रमुख ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारणी करण्याचा निर्णय घेतला. मुक्ताईनगरातील उपजिल्हा रुग्णालयातही जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 80 लाख रुपये निधी खर्च करून ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली परंतु यातून फक्त प्लांटची उभारणी केली असुन त्यासाठी लागणार्‍या पाईपलाईन व इतर यंत्रणेची उभारणी करण्यात न आल्याने हा प्लांट वापराअभावी धूळखात पडला आहे.

गाजा-वाजा करणार्‍या लोकप्रतिनिधींना टोला
ज्या लोकप्रतिनिधी यांनी हा प्लांट उभारण्याचा गाजावाजा केला यावर राजकारण केले, त्यांनी प्लांट ची उभारणी होऊन प्लांट सुरू करावा यासाठी प्रयत्न करावेत, असे राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या. यावेळी अतुल पाटील, प्रवीण पाटील, बाळा चिंचोले, निलेश भालेराव, बापू ससाणे, राहुल पाटील, भैय्या पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप साळुंके, जुबेर अली, अयाज पटेल, एजाज खान, फिरोज सय्यद, ईरफान खान, वहाब खान, सलीम शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.