भुसावळ शहरात दुर्गा दौड उत्साहात
भुसावळ (12 ऑक्टोबर 2024) : शहरात श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ दिवसांच्या दुर्गा दौडचा समारोप झाला. सकाळी सात वाजेला नाहाटा चौफुलीपासून दुर्गा दौडला प्रारंभ झाला. ध्वजपूजन आणि कोहळा कापून दुर्गा दौंड सुरू झाली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी इस्कॉन मंदिराचे जितेंद्र कृष्ण, प्रणव दाभाडे, तमाल कृष्णा, प्रा.डॉ.सुनील नेवे, अॅड.योगेश बाविस्कर, माजी नगरसेवक पिंटू ठाकूर, हिंमतसिंग ठाकूर, व्यापारी असोसिएशनचे राधेश्याम लाहोटी, डॉ.वैभव पाटील, वरुण इंगळे, राधाकृष्ण प्रभात फेरीचे सदस्य, विनीता नेवे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान भुसावळ जिल्ह्याचे प्रमुख रितेश जैन, शेकडो धारकरी उपस्थित होते.
दुर्गा दौडवर भुसावळकरांची पुष्पवृष्टी
शिवरायांचा जयघोष आणि आई जगदंबेचा जय घोष करत मुख्य मार्गाने जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दुर्गा दौडचा समारोप झाला. समारोपप्रसंगी प्रवीण नायसे यांनी मार्गदर्शन केले. मार्गात ठिकठिकाणी पुष्पृष्टी करण्यात आली होती. या दुर्गा दौडमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावर्षी भुसावळ शहरासह भुसावळ तालुक्यात 15 ठिकाणी दुर्गा दौड उपक्रम राबविण्यात आला.