कुर्‍हानजीक भरधाव पिकअप डंपरला धडकली : धानोरीतील चालक ठार ; दोघे जखमी


भुसावळ (18 ऑक्टोबर 2024) : भरधाव पिकअप वाहन डंपरवर जावून धडकल्यानंतर झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर दोन सहप्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात कुर्‍हा-मोंढाळा रस्त्यावरील शेताजवळ गुरुवारी दुपारी 12.20 वाजता घडला. भावसिंग रामदास पवार (रा.धानोरी, ता.बोदवड) असे मयत चालकाचे नाव आहे.

नियंत्रण सुटल्याने अपघात
भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा-मोंढाळा रस्त्यावरील शेताजवळ भरधाव पिकअप वाहन (एम.एच.19 सी.वाय.8049) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती डंपर (एम.एच.19 झेड.3943) वर धडकून उलटली. या अपघातात पिकअप चालक भावसिंग पवार याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले प्रवीण संजय जाधव, अजय आनंदा बेलदार गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भुसावळातील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. ईश्वर संजू जाधव (25, रा.धानोरी, ता.बोदवड) यांच्या फिर्यादीवरून मयत चालक भावसिंग पवार विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !