खडका-किन्ही एमआयडीसीत चोरी : आठ हजार तीनशे रुपयांचे साहित्य लंपास


भुसावळ (23 ऑक्टोबर 2024) : खडका-किन्ही एमआयडीसी भागातील कंपनीतून चोरट्यांनी आठ हजार तीनशे रुपयांचे साहित्य लांबवले. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते 3 ऑक्टोंबरच्या सकाळी 10.30 दरम्यान घडली. भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
गौरव अनिल तायडे (22, फेकरी शिवार, भुसावळ) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, खडका-किन्ही भागातील एमआयडीसी भागातील गौरव सीएनसी टूल अ‍ॅण्ड डायमेकर कंपनीची खिडकी तोडून चोरट्यांनी लोखंडी खिडकी, लोखंडी टेबल, तीन लोखंडी हातगाड्या तसेच आसारी व पलंग मिळून आठ हजार तीनशे रुपये किंमतीचे साहित्य लांबवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप बडगे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !