रावेरात नाकाबंदीत पावणेतीन लाखांची रक्कम जप्त
An amount of Rs. 3 lakhs was seized in Rawera blockade रावेर (24 ऑक्टोबर 2024) : विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीच्या अनुषंगाने रावेर पोलीस ठाण्याकडून विविध ठिकाणी तपासणीसाठी नाकाबंदी पथके कार्यान्वीत करण्यात आली. शहरात नाकाबंदी दरम्यान दोन इसमांकडे दोन लाख 75 हजार 930रुपयांची रोकड आढळल्याने ती जप्त करण्यात आली.
रोखीचा पुरावा आला देता नाही
महसूल विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार 22 रोजी सायंकाळी 8.30 वाजेच्या सुमारास नाकाबंदी असतांना सुनील लखिचंद लुल्ल (46, आदर्श नगर, भुसावळ) हे काळी बॅग घेवून जात असतांना मिळून आले. तपासणी केली असता 85 हजार 230 रुपये रोख तर राहुल सुनील खटवाणी (रावेर) यांच्याकडे एक लाख 90 हजार 700 रुपये आढळले. दोन लाख 75 हजार 930 रुपयांची रोकड मिळून आल्याने तपासणी पथकाव्दारे रकमेचा पुरावा मागितला असता संबंधीतांना देता आला नाही. रकमेबाबत ईएसएमएस प्रणालीव्दारे अनुसार जिल्हा तक्रार निवारण समितीसमोर पुढील योग्य त्या कारवाईसाठी प्रकरण पाठविण्यात आले.

