किनगावात विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चार लाखांची फसवणूक : तत्कालीन सचिवाविरुद्ध गुन्हा


Four lakh fraud of various Executive Co-operative Societies in Kingaon : Crime against the then Secretary यावल (25 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील किनगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत मागील आर्थिक वर्षात तत्कालीन सचिवाने तब्बल चार लाख आठ हजार 112 रुपयात संस्थेची फसवणूक केल्याचे लेखा परीक्षणात समोर आले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात संबंधित सचिवाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
किनगाव गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सचिव म्हणून उदय रमेश चौधरी हे कार्यरत होते. दरम्यान 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 च्या दरम्यान संस्थेची चार लाख आठ हजार 112 रुपयात फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. लेखा परीक्षणामध्ये ही बाब समोर आल्यानंतर उदय चौधरी यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात लेखा परिक्षक भागवत पाटील यांच्या फिर्यादी वरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !