भुसावळात दारू दुकानात बालमजूर : जिल्हाधिकार्यांकडून कारवाईचे आदेश
भुसावळ (25 ऑक्टोबर 2024) : शहरातील जामनेर रोडवरील मधुर वाईन शॉपमध्ये एक अल्पवयीन मुलगा दारू विक्री करीत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली होती. या अर्जाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी राज्य उत्पादन शुल्क, जळगाव कार्यालयाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने खळबळ
शहरातील जामनेर रोडवरील मधुर वाईन शॉपमध्ये एक अल्पवयीन मुलगा कामाला असून तो दारूची विक्री करीत असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना दिसून आल्याने त्याबाबत सानप 14 ऑक्टोबर 24 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे पत्र केदारनाथ सानप यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 22 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाले आहे.


