अंजाळे गावाजवळ 38 वर्षीय तरुणाला तिघांची मारहाण : यावल पोलिसात गुन्हा दाखल


A 38-year-old youth was beaten up by three people near Anjale village : A case has been registered with the Yaval police यावल (26 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ 38 वर्षीय तरुणाला तुझ्यामुळे आमच्या वाहनाला अपघात झाला, असे सांगत तीन जणांनी शिविगाळ करीत मारहाण केली आणि त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
अंजाळे, ता.यावल या गावाजवळ निलेश अशोक चौधरी (38, अंजाळे) हा तरुण उभा असताना त्याला दर्शन प्रमोद काळे, प्रमोद वसंत काळे आणि दर्शन राजेंद्र पाटील (तिघे राहणार बारीवाडा, यावल) यांनी तुझ्यामुळे आमच्या गाडीला अपघात झाला, असे सांगत मारहाण केली व ठार मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी निलेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !