दुचाकी घसरल्याने रोझोद्यातील 21 वर्षीय तरुण ठार
A 21-year-old youth from Rojoda was killed when his bike fell यावल (27 ऑक्टोबर 2024) : रावेर तालुक्यातील रोजोदा ते खिरोदा या रस्त्यावर दुचाकी घसरून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. मयत तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात अपघाताच्या नोंदणीची कार्यवाही सुरू होती.
डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू
रावेर तालुक्यातील खिरोदा ते रोझोदा या रस्त्यावर रोझोदा गावाजवळ स्मशानभूमीच्या पुढे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ई.एच. 8321) द्वारे देवेंद्र राजेंद्र कोळी (21, रोझोदा) हा तरुण न्हावी गावाकडे जात असताना त्याची दुचाकी घसरली आणि त्याच्या डोक्याला दगड लागून दुखापत झाली. त्याला तातडीने तेथून सावदा व नंतर भुसावळ येथील रूग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रस्त्यात तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत या अपघात संदर्भात पोलिसांच्या वतीने नोंद घेण्याचे काम सुरू होते.

