अंजाळे-निमगाव दरम्यान ट्रॅक्टर अपघातात भालशीव गावातील तरुण ठार


यावल (31 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील अंजाळे ते निमगाव या रस्त्या दरम्यान ट्रॅक्टर अपघातात भालशीव येथील 27 वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पंकज बळीराम सोनवणे (27, भालशीव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अपघातात तरुणाचा मृत्यू
अंजाळे ते निमगाव या रस्त्यावर शुक्रवार, 25 ऑक्टोंबर रोजी ट्रॅक्टर अपघातामध्ये पंकज बळीराम सोनवणे (27) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचाराकरिता त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जळगाव येथे उपचारादरम्यान त्याचा सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी अकस्मात मृत्यूची नों द करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !