भुसावळ शहरातील वाल्मीक नगरात आग : सिलिंडर बाहेर काढल्याने टळला अनर्थ


Fire in Valmik Nagar in Bhusawal : Disaster was averted by taking out the cylinder भुसावळ (5 नोव्हेंबर 2024) : भुसावळ शहरातील वाल्मीक नगरात सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने अचानक आग लागल्याने मोठीच धावपळ झाली. माजी नगरसेवक निर्मल कोठारी आणि पालिकेच्या कर्मचार्‍यांनी घरातील दोन सिलेंडर मोठ्या धाडसाने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

सिलिंडर बाहेर काढल्याने टळला अनर्थ
शहरातील वाल्मीक नगर भागात सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अमन बोयत यांच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यामुळे वाल्मीक नगरात धावपळ उडाली. पालिकेच्या बंबास पाचारण करण्यात आले. बोयत यांच्या घरात दोन भरलेले सिलेंडर होते. यावेळी माजी नगरसेवक निर्मल कोठारी आणि पालिकेच्या कर्मचार्‍यांनी आग लागलेल्या घरात धाडस करीत शिरत दोन्ही सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीनंतर वाल्मिक नगरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली. पालिकेच्या तीन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. आगीत घरातील साहित्य जळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !