उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ समोर


नागपूर (13 नोव्हेंबर 2024) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे मात्र हा व्हिडिओ 5 नोव्हेंबरचा असून या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळीचा हा व्हिडिओ आहे. यानंतर 7 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात देखील फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्यासारखे व्हिडिओ बनवून अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यवतमाळ-औसा येथे उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासल्या
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचारानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात गेले असता हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताना त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर धाराशीव जिल्ह्यातील औसा येथे देखील उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ बनवत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग तसेच सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टिकेा आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


नियमानुसारच बॅगांची तपासणी
या संदर्भात निवडणूक आयोगाच्या वतीने देखील स्पष्टिकरण देण्यात आले आहे. नेत्यांच्या बॅगांची तपासणी ही नियमानुसारच असल्याचे आयोगाने म्हटले आहे. इतकेच नाही तर गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगांची देखील तपासणी करण्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !