धक्कादायक ! : विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच दुर्दैवी मृत्यू
बीड (20 नोव्हेंबर 2024) : बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा छत्रपती शाहू विद्यालयात असणार्या मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे बीड शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
विधानसभा निवडणुकांचे मतदान असलेल्या अपक्ष उमेदवार बाळसाहेब शिंदे हे छत्रपती शाहू विद्यालयात असणार्या मतदान केंद्रावर थांबले होते. दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना बीड शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. या मतदारसंघांत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संदीप क्षीरसागर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने योगेश क्षीरसागर हे तगडे उमेदवार मैदानात आहेत.