कोळवद येथून शेतातून भुईमुगाच्या शेंगांची चोरी


यावल (मंगळवार 8 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील कोळवद येथील शेतातून दिड हजार रुपये किंमतीच्या भुईमुगाच्या ओल्या शेंगा चोरी केल्याप्रकरणी यावल पोलिसात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोळवद गावातील शेतकरी चंदन मिठाराम महाजन यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे कोळवद शेत शिवारात शेत गट क्रमांक 94 आहे. यामध्ये त्यांनी भुईमूगाची लागवड केली होती व उत्पन्न काढायला आता सुरुवात झाली होती. शेतातून दहा किलो वजनाच्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा गरबू दगडू तडवी (65, रा.कोळवद) यांनी चोरी करून नेल्या. दीड हजार रुपये किंमतीच्या या शेंगा होत्या. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !