सुकमा जिल्ह्यात चकमकीत दहा नक्षलवादी ठार


नवी दिल्ली (22 नोव्ळेंबर 2024) : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून तीन स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्याचवेळी दोन्ही बाजूंनी जंगलात अधूनमधून गोळीबार सुरू आहे. हे प्रकरण भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 1 जानेवारी ते 22 नोव्हेंबरपर्यंत 207 नक्षलवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले,

अत्याधूनिक शस्त्र जप्त
बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, या चकमकीत आतापर्यंत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळावरून एके-47, इन्सास आणि एसएलआरसह इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. हे मोठे यश असल्याचे सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी म्हटले आहे. जवान घटनास्थळी आहेत. परतल्यावर अधिक माहिती मिळेल.

नक्षलवादी ओडिशातून घुसले होते
भेज्जीच्या जंगलात नक्षलवाद्यांचा जमाव असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर जवानांना पाठवण्यात आले, तिथे नक्षलवाद्यांशी चकमक झाली. एक दिवस आधी ओडिशातून मोठ्या संख्येने नक्षलवादी छत्तीसगड सीमेत घुसले होते. या काळात ओडिशा पोलिसांसोबत चकमकही झाली. यात एक नक्षलवादी ठार झाला असून एक जवान जखमी झाला आहे. यानंतर छत्तीसगड फोर्स अलर्टवर होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !