जळगावातून चोरट्यांनी शेळ्यांसह बोकड लांबवले
जळगाव (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : शिरसोली परिसरातील मलिकनगर येथे घरासमोर बांधलेल्या सहा शेळ्या-बोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मलिकनगर, शिरसोली प्र.न. ता. जळगाव येथील रहिवासी विशाका अमीन हनीफ पिंजारी (46) यांच्या घरासमोर शेळ्यांसह बोकड बांधण्यात आली असता 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी दोन वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधली.
चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये लाल रंगाची एक बकरी, पांढरी एक बकरी, काळ्या रंगाच्या दोन बकर्या तसेच पांढर्या-काळ्या रंगाचे दोन बोकड यांचा समावेश आहे. या सहा जनावरांची एकूण किंमत सुमारे 24 हजार रुपये आहे. विशाका पिंजारी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




