आरआरबी परीक्षार्थींसाठी मुंबई आणि नागपूर दरम्यान 10 विशेष गाड्या धावणार


भुसावळ (22 नोव्हेंबर 2024) : रेल्वे भरती मंडळाच्या (आरआरबी) परीक्षेला उपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि नागपूर दरम्यान 10 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 01103 आरआरबी विशेष गाडी 23 ते 27 दरम्यान दररोज मुंबई येथून 3.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसर्‍या दिवशी 10.50 वाजता पोहोचेल. या गाडीच्या पाच फेर्‍या होतील तर 01104 आरआरबी विशेष गाडी दिनांक 24 ते 28 पर्यंत दररोज नागपूर येथून 1.30 वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबई येथे दुसर्‍या दिवशी 4.10 वाजता पोहोचयार असून या गाडीच्या पाच फेर्‍या होतील.

या स्थानकावर गाडीला थांबा
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन वातानुकूलित थ्री टियर डबे, आठ स्लीपर डबे, आठ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे (यामध्ये 2 ब्रेक व्हॅन समाविष्ट) असतील. वरील गाड्यांचे आरक्षण संकेतस्थळावर सुरू झाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !