एरंडोल-पारोळा मतदारसंघात शिवसेनेचे अमोल पाटील यांनी मारली बाजी
Shiv Sena’s Amol Patil wins in Erandol-Parola constituency एरंडोल (23 नोव्हेंबर 2024) : बंडखोरी तसेच अपक्षांच्या भाऊगर्दीमुळे सर्वाधिक चर्चेत आलेल्या एरंडोल-पारोळा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
दावे ठरवले फोल : अमोल पाटील 26 हार 332 मतांनी विजयी
एरंडोल विधानसभा मतदार संघातून अमोल पाटील हे 56 हजार 332 मतांचा लीड घेत विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सतीश पाटील यांना 44 हजार 756 तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना 41 हजार 395 मते मिळाली. भाजपा बंडखोर ए.टी.नाना पाटील, अपक्ष डॉ.हर्षल माने यांच्यासह अपक्षांना जनतेने नाकारले.

एरंडोल-पारोळ्यात जल्लोष
आमदार चिमणराव पाटील यांचे अमोल पाटील हे पूत्र असून त्यांच्या विजयानंतर एरंडोलसह पारोळ्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.




