सामाजिक समीकरणे निष्प्रभ ठरवत जळगावात आमदार राजूमामा भोळे यांचा दणदणीत विजय


MLA Rajumama Bhole’s resounding victory in Jalgaon, neutralizing social equations जळगाव (23 नोव्हेंबर 2024) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार सुरेश भोळे यांनी सर्व सामाजिक समीकरणे निष्प्रभ ठरवत सलग विजयी पताका फडकवली. आमदारांच्या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आतिषबाजी करुन व पेढे भरवून साजरा करण्यात आला.

पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत
सुरेश भोळे हे सलग तिसर्‍यांदा आमदार होत आहेत. आमदार भोळे यांचे भारतीय जनता पक्ष कार्यलयात जोषात स्वागत करण्यात आले. आमदार भोळे यांचे पक्ष कार्यालयात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात यांचे स्वागत करण्यात आले.





87 हजार 503 मतांचा लीड
आमदार राजूमामा भोळे यांना एक लाख 51 हजार 536 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार जयश्री सुनील महाजन यांना 64 हजार 33 मते मिळाली व आमदार भोळे हे 87 हजार 503 मतांचा लीड घेवून पुनश्च विजयी झाले. विजयाची घोषणा होताच महायुती समर्थकांनी फटाके फोडून व फुलांची उधळण करीत जल्लोष केला.

जनतेने दिली पुन्हा काम करण्याची संधी : आमदार राजूमामा भोळे
आमदार राजूमामा भोळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी 25 वर्षांपासून राजकारणात असून मागील 10 वर्षांपासून आमदार म्हणून काम करत आहे. या दहा वर्षांत 100 टक्के कामे झाल्याचा आम्ही दावा केलेला नाही. 75 टक्के कामे झाले असून 25 टक्के कामे ही प्रगतीपथावर आहेत. जनतेला आम्हाला पुन्हा सेवा करण्याची संधी यामुळे त्यांचे मी आभारी आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !