चाळीसगाव विधानसभेत आमदार मंगेशदादा चव्हाणांचा दणदणीत विजय : पदाधिकार्यांकडून फुलांच्या वर्षावात उत्स्फूर्त स्वागत
MLA Mangeshdada Chavan’s resounding victory in Chalisgaon Assembly : Spontaneous welcome with shower of flowers from office bearers चाळीसगाव (23 नोव्हेंबर 2024) : चाळीसगावात अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सलग दुसर्यांदा विजयी होण्याचा मान मिळवला. दोस्तीतील कुस्ती कोण जिंकणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले असताना चाळीसगावकरांनी मात्र आमदार मंगेशदादांवर पुन्हा विश्वास टाकत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
85 हजार 653 मतांनी आमदार मंगेशदादा विजयी
आमदार मंगेश चव्हाण यांची लढत महाविकास आघाडीचे उन्मेष पाटील यांच्याशी झाली. अत्यंत चुरशीच्या वाटणार्या या निवडणुकीत आमदार मंगेशदादा यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या प्रचार करीत केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेचा कौल मागितला. निकालानुसार आमदार मंगेश चव्हाण यांना एक लाख 57 हजार 101 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार उन्मेशदादा चव्हाण यांना 85 हजार 653 मते मिळाली. 85 हजार 653 मतांच्या फरकाने आमदार मंगेशदादा चव्हाण चाळीसगावातून पुन्हा विजयी झाले.










