दरमहा 2100 रुपयांची घोषणा कधी ? : राज्यातील लाडक्या बहिणींचा सवाल


जळगाव (5 डिसेंबर 2024) : राज्यातील लाडक्या बहिणींनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस यश दिले आहे. आता लाडक्या बहिणींना दीड हजार मिळणार की 2100 रुपये याची उत्सुकता लागली आहे.

लाडक्या बहिणींचे सरकारच्या घोषणेकडे लक्ष !
सरकार येताच आम्ही 2100 रुपये देऊ असे आश्वासन या बहिणींना महायुती सरकारने दिले होते.आतापर्यंत दीड हजार प्रमाणे पाच हप्ते मिळालेले आहेत. जळगाव जिल्ह्यात सव्वा पाच लाख लाडक्या बहिणी आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पैसे लागलीच मिळण्याची आशा मावळली आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून, तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा रंगत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता.



दोन महिन्यांची रक्कम एकत्रच जमा
सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खात्यात जमा केले होतेफ

फेर तपासणीमुळे लाडक्या बहिणी संभ्रमात
गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांवर लाडक्या बहिणींना देण्यात येणारे मानधनज्ञबाबत कागद पत्रांची फेर तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे . यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल तसेच कुटुंबातील एकाच बहिणीला लाभ अशा लाडक्या बहिणी या योजने पासून वंचीत राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे . यामुळे योजनेचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहिणीमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !