मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिगत संबंध उत्तम : आमदार एकनाथराव खडसे
Personal relationship with Chief Minister Devendra Fadnavis is excellent: MLA Eknathrao Khadse जळगाव (8 डिसेंबर 2024) : एकनाथराव खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक संबंध अत्यंत चांगले असल्याचे सांगितले असून आपली त्यांच्याशी कधीही दुश्मनी नव्हती मात्र विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला बोलताना एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणलो की, ईव्हीएमबाबत आपला विरोध नाही मात्र अनेक निकाल हे ईव्हीएम बद्दल संशय निर्माण करणारे राहिले आहेत. ते दूर व्हायला पाहिजे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
देवकरांची ती भूमिका वैयक्तिक
विरोधी पक्षातील भूमिका सक्षमपणे पार पाडणे, हीच माझी जबाबदारी आहे. गुलाबराव देवकर यांची व्यक्तिगत भूमिका आहे. माझे राजकीय जीवन पाहिले तर मी संघर्षामधून पुढे आलो आहे. आपले सरकार असो अथवा नसो, याची मनात शंका नसते. मी सरकार नसताना 90 साली एकटा आमदार असताना सुरुवात केली. संघर्ष केला, सरकारच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती.

रोहिणी खडसे यांचा पराभव मी पहिल्याच दिवशी मान्य केला होता, असेही एकनाथ खडसे म्हणाले. पराभव मान्य केला त्यामुळे निकालाच्या संदर्भात मी प्रतिक्रिया दिली. मात्र, शंका घेण्यात वाव आहे. आम्हाला आमच्या हक्काचे बूथ माहीत असतात. त्याठिकाणी आमचा लीड कमी होतो. त्यावेळी शंका निर्माण होऊ लागली आहे. रोहिणी ताईंनी अपील करण्याचे ठरवले होते. त्यांनी अर्ज मागे घेतला, याची मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले आहे.




