58 वर्षीय मुख्याध्यापक पुत्राच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम डोळ्याने पाहिला 90 वर्षीय मातोश्रींनी
रांजणगाव विद्यालयात सेवानिवृत्त समारंभ
चाळीसगाव (8 डिसेंबर 2024) : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव संस्थेच्या हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथील मुख्याध्यापक गणपत कचेश्वर सानप हे नुकतेच 30 नोव्हेंबर रोजी नियत वयोमानानुसार 32 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत झाले . रांजणगाव विदयालयात त्यांचा सेवानिवृत्त समारंभाचा कार्यक्रम विदयालयामार्फत आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी सर्वप्रथम संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विनायकराव चव्हाण यांनी शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला आणि भावी जीवनासाठी सदिच्छा दिल्यात .
अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी भुषविले . याप्रसंगी व्यासपिठावर सहसचिव रावसाहेब साळुंखे, संचालक भैय्यासाहेब पाटील, ड. साहेबराव पाटील, आर्कीटेक धनंजय चव्हाण, अविनाश देशमुख, सुनिल देशमुख , हंसराज पाटील, शेनपडु पाटील, अलका बोरसे, बारीकराव वाघ, भाऊसाहेब पाटील , महेश चव्हाण, सोनुसिंग राजपुत, तात्यासाहेब निकम, उज्वला पाटील, हरीष महाले, शरद मोराणकर, अनिल कोतकर आदि मान्यवरांसह सर्वच संचालक उपस्थित होते. सोबतच अनेक मान्यवर व गणपत सानप यांचे काका, भावंडांसह सारा परीवार उपस्थित होता. विशेष म्हणजे गणपत सानप या 58 वर्षीय मुख्याध्यापक पुञाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला 90 वर्षाच्या मातोश्री कृष्णाबाई आपल्या मुलाचा कौतुकसोहळा पाहण्यासाठी उपस्थित होत्या. मातोश्रीने आपल्या डोळयांनी आपल्या पुञाचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सुखात अन आनंदाने डोळयाने पाहीला, पुञ मुख्याध्यापक गणपत सानप सेवानिवृत्त कार्यक्रमाला 90 वर्षीय मातोश्रींची उपस्थिती अन आशिर्वादरुपी प्रेमाचा सागर पाहुन उपस्थित सारेच आनंदाच्या क्षणात भारावल्याचे दिसुन आले. असा आगळा वेगळया स्वरुपाचा निरोप समारंभ सोहळा पहायला मिळाला. सर्वप्रथम स्वागत गीत, प्रतिमा पूजन व मान्यवरांचा तसेच सत्कार मुर्ती गणपत सानप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . हा सत्कार रांजणगाव विदयालयाचा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संचालक मंडळ, विविध शाळांचे कर्मचारी, नातेवाईक, नागरीकांमार्फत करण्यात आला.

त्यानंतर माजी मुख्याध्यापक एम. जे.चौधरी , माजी मुख्याध्यापक सांगळे , देवळी विदयालयाचे मुख्याध्यापक अमृतकार , विद्यालयातर्फे जेष्ठ शिक्षक व्ही. टी. पाटील, काका ड. रामनाथ सानप, बंधू प्रकाश सानप , जावई किरण डोंगरे, कन्या प्रियंका डोंगरे, जेष्ठ संचालक भैय्यासाहेब पाटील , शिघ्र कवी पोतदार, धनराज पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गणपत सानप सत्कार मूर्ती यांनी सत्काराला उत्तर देतांना 32 वर्षाचा खडतर प्रवास मांडला.संस्था, मिञ परीवाराचे मला अनमोल सहकार्य लाभले. आज माझा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पाहुन मी ही भारावलो आहे. असेही शेवटी मनोगतातुन मुख्याध्यापक गणपत सानप यांनी सांगितले व सर्वांचे मनस्वी आभार मानले. आणि शेवटी अध्यक्षीय भाषणातुन संस्थेचे सचीव बाळासाहेब चव्हाण यांनी मुख्याध्यापक गणपत सानप यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला. आणि भावी आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या. विदयालयात नवीन नियुक्ती झालेले मुख्याध्यापक बी. एम. बागल यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुञसंचलन उपशिक्षिका तथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख दिपाली पाटील यांनी केले. विद्यालयाचे शिक्षक हरीष शेटे यांनी आभार मानले. आणि शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. व सेवापूर्ती सोळळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ, विविध शाखांचे आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरीक, मिञ परीवार, अंधारी व नाशिक जिल्हयातील नातेवाईक मंडळी मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्विततेसाठी रांजणगाव विदयालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परीश्रम घेतले.




