मंत्री पद आढाव्यात अब्दुल सत्तारांसह संजय राठोड ‘नापास’ ; शिंदेच्या आढाव्यात पाच मंत्री ‘पास’


मुंबई (8 डिसेंबर 2024) : शिंदेंच्या शिवसेनेमधील मंत्री पदासाठी उत्सुक दोन आमदार नापास तर पाच आमदार पास झाले आहेत. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार अशी नापास झालेल्या मंत्र्यांची नावे असून उदय सामंत, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक पास झाले आहेत. शिंदेंच्या मंत्री मंडळात सत्तारांकडे अल्पसंख्यांक विकास आणि संजय राठोडांकडे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

दोघा आमदारांना मोठा धक्का
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यासाठी हा धक्का आहे. याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यंदा भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. उदय सामंत, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रताप सरनाईक ही पाच नावं जवळपास निश्चित मानली जात आहे. महायुतीमध्ये शिंदे गटाला 13 ते 14 मंत्री पदे मिळणार असल्याची माहिती आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !