विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निवड
मुंबई (9 डिसेंबर 2024) : भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानत राहुल नार्वेकरांचं कौतुक केले.
तुम्ही परत आल्याचा आनंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हटलं नव्हते तरी तुम्ही परत आलात त्याचा मनापासून आनंद आहे. तुमच्यासारखा निष्णांत वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला त्यामुळे न्याय देण्याचं काम तुमच्याकडून होईल यात शंका नाही. राहुल नार्वेकर कदाचित पहिलेच आमदार असतील जे पहिल्या टर्ममध्ये अध्यक्ष बनले, दुसर्या टर्ममध्येही अध्यक्ष बनले. नानाभाऊंनी वाट मोकळी केल्याने ते मागील वेळी विधानसभा अध्यक्ष बनले असा चिमटा काढत त्यांनी नाना पटोलेंचे आभार मानले.

नाना करते प्यार, तुम्हीसे कर बैठे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांचे आभार मानले. ते मिडीयासमोर काहीही बोलत असले तरी ते आमचे चांगले मित्र असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. या वेळी ’नाना करते प्यास, तुम्हीसे कर बैठे’ या गाण्याच्या ओळी म्हणत एकनाथ शिंदे यांनी नानांना कोपरखळी मारली. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही खरे स्विकारत असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडेल त्या आम्ही स्वीकारू
अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षासाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही भांडण झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. सभागृहातील सगळ्या सदस्यांसाठी राहुल नार्वेकरांचे अध्यक्षांचे दालन सर्व पक्षातील सर्व सदस्य सातत्याने जायचे. कितीही भांडण झाले तरी अध्यक्षांच्या दालनात वाद संपलेले असायचे. अध्यक्ष दोन्ही बाजूचे ऐकतात. यावेळीही अध्यक्षांकडे ही जबाबदारी आहे. लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणे हे सृदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. संख्याबळ न पाहता महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल ते स्वीकारण्याची जबाबदारी आम्हीही घेतली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.




