बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई : दरोड्याच्या तयारीतील भुसावळ, फैजपूरसह खंडव्यातील सात संशयीतांना बेड्या

आरोपींकडून बंदुका, तलवारी, चाकू जप्त : जळगावात पोलीस अधीक्षकांची माहिती


Major action by market police: Seven suspects from Bhusawal, Faizpur and Khandwa arrested for planning a robbery भुसावळ (9 डिसेंबर 2024) : दरोड्यासह मोठत्त गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांकडून 2 गावठी कट्टे, 4 काडतूस, 4 चाकू, 4 तलवारी, 1 फायटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जळगावात दिली.

सात आरोपींना अटक
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना दि. 8 रोजी रात्री 8.15 वाजता भुसावळ – नागपुर हायवे लगत असलेल्या अलिशान वॉटर पार्कचे मागील बाजुला असलेले मोकळ्या जागेत बंदूक आणि घातक हत्यारांसह गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत 7 – 8 लोक उभे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी लागलीच अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाला बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्यासाठी रवाना केले. त्याठिकाणी दरोड्याच्या तयारीत किंवा मोठा घातक गुन्हा करणाच्या तयारीत असलेल्या सात जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

या आरोपींना अटक
पोलिसांनी इम्रान शेख उर्फ मॉडेल रसूल शेख रा.भारत नगर, भुसावळ, अरबाज शेख शबीर रा.तेली गल्ली, भुसावळ, मुजम्मिल शेख मुज्जू शेख हकाम रा.फैजपूर, शोएब इकबाल खाटीक रा.फैजपूर, आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर रा.खंडवा, राहुल उर्फ चिकू राम डेंडवाल रा.खंडवा, मोहित जितेंद्र मेलावंस रा.खंडवा यांचेवर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, हवालदार महेश चौधरी, सोपान पाटील, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, राहुल वानखेडे अशांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !