आठ हजारांची लाच भोवली : नांदगाव पंचायत समितीचा सहा.प्रशासन अधिकारी जाळ्यात


Bribe of eight thousand rupees : Sixth administrative officer of Nandgaon Panchayat Samiti caught in the net नांदगाव (10 डिसेंबर 2024) : दप्तर तपासणीचा चांगला अहवाल देण्याच्या मोबदल्यात आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नांदगाव पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासन अधिकार्‍याला नाशिक एसीबीने अटक केली आहे. प्रमोद रंगनाथ नवले (46, रा.महाजन वाडा, मुक्ताईनगर, मालेगाव रोड, नांदगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
46 वर्षीय तक्रारदार यांचे कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी आरोपी नवले हे येणार होते. कार्यालयात तक्रारदाराच्या टेबलाची तपासणी करून देतो तसेच तपासणी करण्याचा चांगला अहवाल देतो म्हणून तीन हजारांची लाच मागण्यात आली तसेच तक्रारदाराच्या कार्यालयातील निलंबित कर्मचारी जमदाडे याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्याच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या, मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो, असे सांगून एकूण आठ हजार लाच मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. आठ हजारांची लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली व त्याच्याविरोधात नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक एकनाथ गं.पाटील, हवालदार सुनील पवार, संदीप वणवे, योगेश साळवे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !