गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेश लांबणीवर !

अजिदादांनी शिष्टमंडळाला केले आश्वास्त : प्रवेशाचे आता भिजत घोंगडे


Gulabrao Devkar’s entry into the Nationalist Ajit Pawar faction has been delayed! मुंबई (11 डिसेंबर 2024) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पराभूत उमेदवार गुलाबराव देवकर यांना अजित पवार राष्ट्रवादी पक्षात तूर्त प्रवेश मिळणार नसून त्यांची तुतारी बाजूला ठेवून हातावर घड्याळ बांधायची इच्छा सध्याच्या घडीला तरी पूर्ण होणार नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनीच आता स्वतः याबाबत स्पष्टता देत दोन महिन्यानंतर कुणाला पक्षात घ्यायचे याचे धोरण ठरवले जाईल त्यानंतरच विचार होईल, असे मुंबईतील जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकार्‍यांना सांगितले. त्यामुळे गुलाबराव देवकर यांचा प्रवेशाचा मनसुबा भिजत घोंगडे पडेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

देवकरांच्या प्रवेशाला कडाडून विरोध
देवकर आप्पांच्या प्रवेशाला पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी विरोध करत त्यांना प्रवेश देवू नये यासाठी प्रतिनिधीक शिष्टमंडळाने अजितदादा पवार यांची आज 10 रोजी मुंबईत भेट घेतली. दरम्यान, अजितदादा यांनी सर्व पदाधिकार्‍यांना आश्वस्त करत आपल्या भावना माझ्यापर्यंत पोेहोचल्या असून कठीण काळात आपण पक्षासोबत होतात त्याची मला जाणीव असल्याने तूर्त तरी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे रोखठोक सांगितल्याने देवकर यांची घडी बसण्याचे संकेत लांबणीवर पडले आहेत.


सुनील तटकरे यांची घेतली होती भेट
गुलाबराव देवकर यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले होते.मात्र स्थानिक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला होता. धरणगावचे माजी नगराध्यक्ष व ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह इतरांनी पक्ष कार्यालयात बैठक घेऊन पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती.गुलाबराव देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचाच नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन आज स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी अजितदादा पवार यांच्याजवळ देवकर आप्पा यांनी गेल्या काळात पक्षावर व नेत्यांवर केलेली टीका तसेच ते पक्षात आल्यास संभाव्य धोके लक्षात आणून देणारे पाढे वाचले त्यावर अजितदादा यांनी कुणाच्याही प्रवेशाचा सद्द्या विचार नसून आपण या गोष्टीवर ताकद खर्च न करता आपापले काम असेच इमाने- इतबारे करीत राहण्याचा सल्ला दिला.

यांचा शिष्टमंडळाने घेतले दादांची भेट
धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पा महाजन, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, प्रदेश सरचिटणीस कल्पना अहिरे,जळगाव ग्रामीण विधानसभा प्रमुख रमेश पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष शामकांत पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष भूषण पवार, जिल्हा कार्याध्यक्ष नाटेश्वर पवार, किसान सेल जिल्हाध्यक्ष लाला पाटील, धरणगाव महिला आघाडी तालुकाध्यक्ष शोभाताई पाटील या पदाधिकारी यांनी अजितदादा यांची भेट घेतली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !