बसला गिअर, क्लच नसल्याने गफलत ; कुर्ल्यात सात जणांचे बळी घेणार्या चालकाची पोलिसांना कबुली
The bus had no gear, no clutch, and was negligent ; Driver who killed seven people in Kurla confesses to police वृत्तसंस्था । मुंबई (12 डिसेंबर 2024) : गिअर व क्लच असलेल्या बस चालवण्याचा अनुभव असलेल्या चालकाच्या हाती अॅटोमेटीक बस देण्यात आली व अनुभव नसताना चालकाची बस चालवताना गफलत होवून कुर्ल्यात सात जणांचे बळी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. अटकेतील बेस्टच्या चालकाने पोलिसांना अखेर अपघाताचे खरे कारण सांगितले आहे. गिअर, क्लच नसल्याने गफलत झाली व त्यातून हा अपघात झाल्याची कबुली आरोपी संजय मोरे याने दिली आहे. ऑटोमेटीक बस चालवण्याचा कुठलाही अनुभव नसताना त्याच्या हाती ही बस सोपवण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
गोंधळून झाला अपघात
अत्याधुनिक आणि पॉवर स्टिअरिंगसह संवेदनशील सेन्सर इलेक्ट्रिक बसेसमध्ये आहेत. त्याला गिअर आणि क्लच नसल्याने ऑटोमॅटिक पद्धतीने या बसेस फक्त ब्रेक आणि क्सिलरेटरवर चालतात. यामध्येच चालक संजय मोरेची गफलत झाली. ब्रेक आणि क्सिलरेटर असलेल्या बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याने गोंधळून बसचा अपघात झाल्याची कबुली आरोपी मोरेने पोलिसांना दिली आहे.

पहिल्यांदाच ऑटोमॅटिक चालवली ऑटोमेटीक बस
संजय मोरेने 1 डिसेंबर रोजी रुजू झाल्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली. थातूरमातूर नावापुरते ट्रेनिंग करून तातडीने बेस्ट प्रशासनाने त्याला रस्त्यावर प्रवासी वाहतुकीसाठी पाठवले. रुजू झाल्यानंतर नवव्या दिवशी संजय मोरेला ऑटोमॅटिक बस चालवायला दिली. कुर्ल्यासारख्या गजबजलेल्या परिसरातील डेपोमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली. परिणामी बस चालवताना गोंधळलेल्या मोरेच्या हाताने अपघात होऊन 7 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 49 जण गंभीर जखमी झाले आहेत. कुर्ला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत आरोपी मोरेला पोलिस कोठडी सुनावली आहे.

