धरणगाव तालुक्यात महामंडळाच्या बसला अपघात : 28 प्रवासी जखमी
Corporation bus accident in Dharangaon taluka: 28 passengers injured जळगाव (13 डिसेंबर 2024) : जिल्ह्यात 48 तासांपूर्वीच तीन अपघातात चौघांचा मृत्यू ओढवल्यानंतर आता धरणगाव तालुक्यातूनही बस अपघाताची माहिती समोर आली आहे. सुसाट बस इलेक्ट्रिक खांब्यावर धडकल्याने अपघात होवून 28 प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, 13 रोजी पहाटे सहा वाजता घडला.
असे आहे अपघात प्रकरण
धरणगाव तालुक्यातील दोन गावा जवळील स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर धडकली. सुदैवाने पुढील अनर्थ टळला. ही बस लाडली येथून निघून जळगाव येथे रेल मार्गे येत असताना दोनगाव जवळील स्मशानभूमीनजीक अपघात झाला.

वळणावर सुटला बसचा ताबा
धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस (क्रमांक एमएच 14 बीटी 2887) नेहमीप्रमाणे 13 डिसेंबर रोजी सकाळी 5.30 वाजता लाडली गावावरून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन पुढील प्रवासासाठी निघाली. रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोनगावा जवळ स्मशानभूमीच्या वळणावर भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील (56, रा.लाडली) यांचा ताबा सुटल्याने वळणा वरील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. इलेक्ट्रिक खंबामुळे पुढील अनर्थ टळला जर इलेक्ट्रिक खांबा जर नसता तर बस थेट नाल्यामध्ये गेली असती. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत.
हे प्रवासी झाले जखमी
मयुरी पाटील (14), आधार सोनवणे (45), लावण्या सोनवणे (11), सायली पाटील (15), हर्षा पाटील (13), गुंजन सपकाळे (16), जनाबाई पाटील (55), अजय पाटील (13), कुंदन पवार (13), सुनीता भील (46), काजल पाटील (15), मोहिनी शारद पाटील (17), भावना शांताराम पाटील (16), अशोक जगन पाटील (57), वालात्री शंकर शिरसाट (53), कुणाल गुंजाळ पवार (13), रेखाबाई विशाल दांडेकर (25, सर्व रा.रेल, ता.धरणगाव), जिजाबाई पंढरीनाथ पाटील (62), पंढरीनाथ आत्माराम पाटील (67, दोन्ही रा.लाडली, ता.धरणगाव), जगन भीमराव पवार (42), विश्वनाथ सदाशीव पाटील (71), निखील सुधाकर पाटील (23), तन्मय मंगल पाटील (19), गुंजन सुनील पाटील (14), विवेक छगन पाटील (17), राम शरद अवचिते (13), जयेश चंद्रकांत पाटील (16), सायली सुरेश पाटील (17, सर्व रा.रेल, ता.धरणगाव)
नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

