हिंगोणा-हंबर्डी रस्त्यादरम्यान दुचाकी व कारचा अपघात ; दोघे जखमी
यावल (23 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील अ फैजपुर रोडवर असलेल्या हिंगोणा ते हंबर्डी या रस्त्यावर रविवारी सायंकाळी कार आणि दुचाकीचा अपघात घडला.या अपघातात दोन्ही वाहन रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यात दोन्ही वाहन चालक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने फैजपूर येथे हलवण्यात आले आहे.
काय घडले नेमके ?
यावल ते फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गाव आहे. या हिंगोणा गावापासुन हंबर्डी दरम्यानच्या रस्त्यावर कार क्रमांक एम. एच. 19 ए. पी. 3285 व दुचाकी क्रमांक एम.एच.19 इ. एम. 7605 या दोघांचा आपसात अपघात घडला. यात कार रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली व दुचाकी धारक देखील रस्त्याच्या कडेला आढळला गेला. यामध्ये दोघे जखमी झाले. जखमींना नागरिकांच्या मदतीने फैजपूर येथील खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. जखमींची नावे कळू शकली नाही. अपघातानंतर रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या अपघाताबाबत माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आली असून उशिरापर्यंत फैजपूर पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणाची नोंद घेण्याचे काम सुरू होते.