बँक खाते गोठवले, चौफेर अडचणी : वाल्मीक कराड शरण येणार?


बीड (30 डिसेंबर 2024) : राज्यात गाजत असलेल्या बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासह पवनचक्की मालकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड लवकरच पोलिसांना शरण येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीडमधील मोर्चानंतर सरकारने आरोपींची बँक खाती गोठवण्याचे निर्देश दिल्या तसेच आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवल्या आरोपीपुढे केवळ शरणागती हा पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

अटकेचा दावा सीआयडीने फेटाळला
वाल्मिक कराडला रविवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केल्याची चर्चा होती मात्र सीआयडीच्या अधिकार्‍यांनी हा दावा फेटाळून लावला. मात्र, वाल्मिक कराड सोमवारी संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत बीड पोलीस अथवा सीआयडीच्या अधिकार्‍यांसमोर शरण जातील, अशी चर्चा आहे.


कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैनमध्ये, नंतर गायब
11 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आरोपी वाल्मीक कराड 20 दिवसांपासून पोलिसांना सापडलेला नाही. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी कराड हा मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होता. विशेष म्हणजे या वेळी त्याच्यासोबत अंगरक्षक पोलिस कर्मचारीही होता. 13 डिसेंबरपर्यंत तो मध्य प्रदेशातच असल्याचे मोबाइल लोकेशनवरून स्पष्ट झाले, पण नंतर मोबाइल बंद झाल्याने त्याचा शोध लागलेला नाही.

मंत्र्याचा निकटवर्तीय
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातही वाल्मीक कराडवर संशय आहे. तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सध्या सीआयडीकडून कराडच्या पत्नीची रविवारी दुसर्‍यांदा चौकशी करण्यात आली.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !