रक्तदान मानवतेची सर्वात मोठी सेवा : दिलीप औटी
आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा : पुण्यात नववर्षाचे रक्तदान शिबिराने केले स्वागत !
पुणे (3 जानेवारी 2025) : रक्तदान ही मानवतेची सर्वात मोठी सेवा असून रक्तदान चळवळीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुण्यातील आंतरराष्ट्रीय बिझनेस कोच दिलीप औटी यांनी केले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईकडून मद्यपान करून नववर्षाचे स्वागत केले जाते मात्र सामाजिक उपक्रमासाठी नेहमीच हिरारीने पुढाकार घेणार्या औटी फाउंडेशनच्या माध्यमातून नवयुवकांना नववर्षाचे स्वागत रक्तदान शिबिराचे आयोजन करून करण्यात आले.
रक्त शुद्धीकरणामुळे कर्करोगाचा धोकाही
शिबिरप्रसंगी पुण्यातील आंतरराष्ट्रीय बिझनेस कोच दिलीप औटी यांनी मार्गदर्शन सांगितले की, रक्तदानाविषयी आजही नागरिकांमध्ये गैरसमज आहे मात्र रक्तदानाचे अनेक फायदे असून नागरिकांना ही बाब माहित नसल्याने त्यांच्यात गैरसमज अधिक पसरतो. तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो मात्र रक्तदान केल्याने तुमच्या शरीरात लोह संतुलित राहते. अशा प्रकारे, हृदय सर्व रोगांच्या जोखमीपासून संरक्षित ठेवता येते. रक्त शुद्धीकरणामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो शिवाय वेळोवेळी रक्तदान करत राहिल्यास, व्यायामासोबतच सकस आहार घेतल्यास तुमच्या कॅलरीज जलद बर्न होवून वजन नियंत्रणात राहते.

50 हून अधिक युवकांचे रक्तदान
फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत 50 पेक्षा अधिक युवकांनी यावेळी रक्तदान केले. हे रक्तदान लष्कराच्या रक्तपेढीमध्ये बुधवारी झाले. प्रसंगी पुण्यातील आंतरराष्ट्रीय बिझनेस कोच दिलीप औटी, कोमल औटी, महेंद्र लुनिया, शुभा प्रसाद, अमेय गटणे, सागर देशमुख, रमेश शेवाळे, यश नगरकर, नितेश जाधव आदी उपस्थित होते.




